ज्येष्ठ शिक्षक नेते प्रकाश सोनवणे यांचे निधन नाशिकच्या शिक्षण व सहकार क्षेत्रात हळहळ; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
ज्येष्ठ शिक्षक नेते प्रकाश सोनवणे यांचे निधन
नाशिकच्या शिक्षण व सहकार क्षेत्रात हळहळ; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
लेवाजगत न्यूज नाशिक : नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स सोसायटीचे (एनडीएसटी) माजी चेअरमन तथा ज्येष्ठ शिक्षक नेते प्रकाश लीला सोनवणे (वय ६५) यांचे बुधवारी (दि. ३०) राहत्या घरी निधन झाले. या घटनेमुळे शिक्षण आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रकाश सोनवणे हे मखमलाबाद रोडवरील वडजाई माता नगर परिसरातील ‘प्रसन्न’ बंगल्यात वास्तव्यास होते. बुधवारी दुपारी ते घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना महेंद्र पाटील यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
सोनवणे यांनी एनडीएसटीच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासह संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने शिक्षक, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी तसेच परिचितांमध्ये शोक व्यक्त होत आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, हवालदार डांगरे पुढील तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत