Contact Banner

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात

 

raksha-khadse-jalgaon-district-bank-election-nomination

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात

जळगाव (प्रवीण पाटील) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुक्ताईनगर कृषी पतसंस्था अर्थात विकासोच्या माध्यमातून त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.




घोडसगाव, कोथळी आणि कर्की या तीन ठिकाणांहून रक्षाताई खडसे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सूचक अशोक कांडेलकर यांनी हे अर्ज दाखल केले.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या जिल्हा बँक निवडणुकीतील सहभागामुळे जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या उमेदवारीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.