रावेरात रंगलेल्या भुलाबाई महोत्सवात २४ संघांचे दर्जेदार सादरीकरण केशव स्मृती प्रतिष्ठान, डॉ. केतकी पाटील फाउंडेशन व रावेर नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम
रावेरात रंगलेल्या भुलाबाई महोत्सवात २४ संघांचे दर्जेदार सादरीकरण
केशव स्मृती प्रतिष्ठान, डॉ. केतकी पाटील फाउंडेशन व रावेर नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम
लेवाजगत न्यूज रावेर : रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता महाजन, सर्व नगरसेविका तसेच डॉ. केतकी पाटील फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून आणि केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनीच्या वतीने रावेर येथे प्रथमच भव्य भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान, मोठ्या आणि खुल्या गटातून तब्बल २४ संघांनी सहभागी होत भुलाबाईच्या पारंपरिक संस्कृतीचे एकाहून एक सरस सादरीकरण केले.
रावेर नगरपालिका सभागृहात गुरुवार, दि. १ ऑक्टोबर रोजी हा महोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी रंजनाताई पाटील (मोरगाव) होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा संगीता महाजन, दीपिका अग्रवाल, राष्ट्र सेविका समितीच्या कांता पटेल, परीक्षक पियुष रावळ, प्रांजली रस्से, सचिन भिडे आणि डॉ. पूजा महाजन उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भुलाबाईचे पूजन, दीपप्रज्वलन आणि आरती करण्यात आली. भुलाबाईची आरती मोनिका महाजन यांनी सादर केली. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून गौरी जोशी यांनी रावेर येथे भुलाबाई महोत्सव आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट करून सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
परिसरात भुलाबाई संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे बॅनर लावण्यात आले होते. भाजप जिल्हा सरचिटणीस तथा डॉ. केतकी पाटील फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
लहान गट, मोठा गट आणि खुला गट अशा तीन विभागांत २४ संघांनी उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले. परीक्षकांनी परीक्षण केल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. विजेत्या संघांना नगराध्यक्षा संगीता महाजन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे पियुष रावळ, सचिन भिडे, प्रांजली रस्से, डॉ. पूजा महाजन तसेच नगरसेविकांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, शैक्षणिक साहित्य व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रेखा बोंडे, रावेर तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्ष आशा कोळी, पूनम बोंडे, नंदिनी पंत, सुरेखा अस्वल, शारदा चौधरी, अनिता तायडे, वंदना महाजन, शाहीन शेख, मेघा भागवत, सुनीता डेरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व प्रेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले, तर आभार दीपाली महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगराध्यक्षा संगीता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका योगिता महाजन, अर्चना पाटील, सीमा जमादार, प्रमिला पाटील, जयश्री महाजन, सपना महाजन, भाग्यश्री इंगळे, अनिता तायडे, शाहीन शेख, हर्षाली महाजन, शुभांगी महाजन, रेखा बोंडे, गौरी जोशी, आसावरी जोशी यांच्यासह रावेर नगरपालिका व अंबिका व्यायामशाळेचे सहकार्य लाभले. सहभागी संघांना भुलाबाईचा खाऊही वाटप करण्यात आला.
असा आहे निकाल
लहान गट :
प्रथम – आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर
द्वितीय – शांती विद्या मंदिर, फैजपूर
तृतीय – जिल्हा परिषद शाळा, पुनखेडा
उत्तेजनार्थ – सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर
मोठा गट :
प्रथम – उमरेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूर
द्वितीय – आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर
तृतीय – शिवफुले आखाडा, रावेर
उत्तेजनार्थ – सुज्ञा अरुण महाजन शाळा, वढोदा
खुला गट :
प्रथम – राजपूत महिला मंडळ, कोचुर
द्वितीय – आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर
तृतीय – सुंदरकांड महिला मंडळ
उत्तेजनार्थ – नेवे समाज मंडळ, भुसावळ


कोणत्याही टिप्पण्या नाहीत