सावदा नगरपालिकेने घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी! दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सुरज परदेशी यांची मागणी
सावदा नगरपालिकेने घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी!
दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सुरज परदेशी यांची मागणी
लेवाजगत न्यूज सावदा : दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि वाढत्या महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सावदा शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी नगरसेवक तथा शिवसेनेचे सावदा शहराध्यक्ष सुरज परदेशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सावदा शहरातील सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, शेतकरी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सध्याच्या परिस्थितीत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणे कठीण होत आहे. पाणीटंचाईसह वाढत्या महागाईचा आर्थिक भार नागरिकांवर पडत असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच कर थकबाकीच्या कारणास्तव नागरिकांवर कठोर कारवाई करू नये आणि आर्थिक अडचणी लक्षात घेऊन त्यांना आवश्यक सवलत द्यावी, अशी मागणीही सुरज परदेशी यांनी केली आहे.
नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन सावदा नगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीबाबत तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगरसेवक सुरज परदेशी यांनी व्यक्त केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत