Contact Banner

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार हर्षवर्धन सपकाळ; शनिवारी जळगाव जिल्हा दौरा शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी साधणार संवाद

 

dushkalgrast-shetkaryanchya-bandhavar-harshwardhan-sapkale-jalgaon-daura

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार हर्षवर्धन सपकाळ; शनिवारी जळगाव जिल्हा दौरा

शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी साधणार संवाद


dushkalgrast-shetkaryanchya-bandhavar-harshwardhan-sapkale-jalgaon-daura


लेवाजगत न्यूज जळगाव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करणार असून, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणे, शेतीच्या नुकसानीची माहिती घेणे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

असा असेल दौऱ्याचा कार्यक्रम

हर्षवर्धन सपकाळ यांचे शनिवारी सकाळी १० वाजता बोदवड रोडवरील मुक्ताईनगर परिसरात आगमन होणार आहे. सकाळी १०.३० वाजता ते बोदवड तालुक्यातील हिंगणे येथे भेट देणार असून, दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतील.

त्यानंतर सकाळी ११.३० वाजता बोदवड तालुक्यातील येवती येथे भेट देऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत.

दुपारी १ वाजता जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात त्यांचे आगमन होणार असून, यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतीचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील विविध प्रश्नांवर ते आपली भूमिका मांडणार आहेत.

या दौऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या जाणून घेण्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा भर राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.