मस्कावद रोडवरील लोंबकळणाऱ्या वीज तारांचा प्रश्न मार्गी; नवरात्रोत्सवापूर्वी नागरिकांना दिलासा
मस्कावद रोडवरील लोंबकळणाऱ्या वीज तारांचा प्रश्न मार्गी; नवरात्रोत्सवापूर्वी नागरिकांना दिलासा
लेवाजगत न्यूज सावदा (जि. जळगाव) : सावदा शहरातील मस्कावद रोडवरील मरी माता मंदिराजवळ लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तारांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली होती.
याबाबत नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लोंबकळणाऱ्या तारांना सुरक्षित उंचीवर नेण्याची मागणी करण्यात आली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत अखेर संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही करण्यात आली असून, धोकादायक वीज तारांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या कामासाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला. तसेच शिवसेना शहर उपप्रमुख मनीष भंगाळे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रश्नासाठी विशेष प्रयत्न केले.
नवरात्रोत्सवाच्या काळात मरी माता मंदिरात भाविकांची वर्दळ वाढणार असल्याने ही कार्यवाही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वीज तारांचा धोका दूर झाल्याने भाविकांसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन वेळेत कार्यवाही झाल्याबद्दल संबंधित अधिकारी, आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि शिवसेना शहर उपप्रमुख मनीष भंगाळे यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत