जिल्हा परिषदेत विकासकामे व नागरिकांच्या समस्यांवर चर्चा; ग्रामपंचायत प्लेट प्रकरणी नंदकिशोर महाजन यांची चौकशीची मागणी
जिल्हा परिषदेत विकासकामे व नागरिकांच्या समस्यांवर चर्चा; ग्रामपंचायत प्लेट प्रकरणी नंदकिशोर महाजन यांची चौकशीची मागणी
लेवाजगत न्यूज जळगाव : जिल्हा परिषद, जळगाव येथे विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. करिश्मा नायर यांच्याशी जळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, काल अंतुर्ली व पातोंडी, ता. मुक्ताईनगर परिसरातील भेटीदरम्यान काही घरांवर ग्रामपंचायतीशी संबंधित ५० रुपये घेऊन धातूची प्लेट लावण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार नंदकिशोर महाजन यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्ह्यातील अशा प्रकारच्या घटनांची माहिती घेण्याची मागणी केली.
याबाबत त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली असून, चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत