सावद्यात नवरात्रोत्सवानिमित्त रांगोळी, मेहंदी व फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन
सावद्यात नवरात्रोत्सवानिमित्त रांगोळी, मेहंदी व फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन
सावदा लेवाजगत न्यूज -
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सावदा येथील साळीबाग परिसरात नवयुवक दुर्गोत्सव मित्र मंडळ आणि पूजा ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नारीशक्तीचा जागर करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या महोत्सवात रांगोळी, मेहंदी आणि लहान मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस अशा विविध स्पर्धा होणार आहेत. रांगोळी व मेहंदी स्पर्धेसाठी ‘नारीशक्ती : स्त्रीशक्तीचा जागर’ हा विशेष विषय निश्चित करण्यात आला आहे.
या स्पर्धा दररोज सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत नवयुवक दुर्गोत्सव मित्र मंडळ, साळीबाग, सावदा येथे पार पडतील. स्पर्धकांनी आवश्यक साहित्य स्वतः सोबत आणणे आणि निर्धारित वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.
स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम क्रमांकासाठी आकर्षक पैठणी साडी, द्वितीय क्रमांकासाठी सुंदर साडी, तर तृतीय क्रमांकासाठी फॅन्सी बॅग अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धीरज भोगे (९९७०५१६९६६), नयन अत्तरदे (९१३०२९५०६१) आणि पूजा राठोड (७९७२९३९०२८) यांच्याशी संपर्क साधावा.
सावदा शहरासह परिसरातील महिला, मुला-मुली आणि नागरिकांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नवयुवक दुर्गोत्सव मित्र मंडळ आणि पूजा ब्युटी पार्लर परिवारातर्फे करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत