डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी निवड महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील ८९ विद्यार्थ्यांचा बॅडमिंटन निवड चाचणीत सहभाग
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी निवड
महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील ८९ विद्यार्थ्यांचा बॅडमिंटन निवड चाचणीत सहभाग
लेवाजगत न्यूज जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेसाठी १५ व १६ ऑक्टोबर रोजी निवड चाचणी उत्साहात पार पडली. या निवड चाचणीत महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण ८९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या चाचणीदरम्यान डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची अश्वमेध क्रीडा स्पर्धांसाठी निवड करण्यात आली.
राष्ट्रीय व आंतरविद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. वैद्यकीय शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करावी, या दृष्टीने अशा निवड चाचण्यांना विशेष महत्त्व आहे.
क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि खिलाडूवृत्ती विकसित होण्यास मदत होते. विविध महाविद्यालयांतील खेळाडूंना एकत्र येऊन आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी या निवड चाचणीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले.
या निवड चाचणीचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टवरील फीत कापून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षक विशाल काळे व दिलीप गायकवाड, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, क्रीडा संचालक सुरेंद्र गावंडे, पंच विनय पाटील, पराग पाटील, नावेद खान, प्रशिक जितेधोर, शेख आवेज शेख आमीन, रोहन पाटील, क्रीडा सचिव पियूष चिंचकर, वैभव लटपटे आणि जनरल सेक्रेटरी उत्कर्ष भोसले उपस्थित होते.
या निवड चाचणीमुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची अश्वमेध स्पर्धेसाठी झालेली निवड ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत