Contact Banner

तुळजाभवानीची ज्योत घेऊन परतताना भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर

 

tuljabhavani-jyot-accident-three-youths-death

तुळजाभवानीची ज्योत घेऊन परतताना भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर

बीड–सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी परिसरातील दुर्घटना; कंटेनरचालक फरार

लेवा जगत न्यूज |बीड प्रतिनिधी-

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन गावाकडे परतणाऱ्या तरुणांच्या प्रवासावर दुःखाची छाया पसरली. बीड–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी परिसरात कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय राजपूत, अमोल औटे आणि गोरख म्हस्कर अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर शुभम आधाने हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन परतत असताना पिंपळगाव पांढरी परिसरात भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.


अपघातानंतर कंटेनरचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.


या दुर्दैवी घटनेमुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!


या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच जखमी तरुण लवकर बरा होवो, ही प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.