Contact Banner

विभागस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूलची दमदार कामगिरी! मित नेमाडे आणि वृदांत पाटील यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

vibhagstariya-dhanurvidya-spardha-dr-ulhas-patil-school-savda

विभागस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूलची दमदार कामगिरी!

मित नेमाडे आणि वृदांत पाटील यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सावदा, प्रतिनिधी : विभागस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दोन विद्यार्थ्यांनी विभागस्तरावर विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात मित मनोज नेमाडे याने उल्लेखनीय कामगिरी केली, तर १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात वृदांत सचिन पाटील याने आपल्या कौशल्याची छाप पाडली. या दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतही यशाची परंपरा कायम राखण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक असलम अली, वसीम शहा, प्रशांत सोनवणे, तुषार सैतवाल आणि रिमशा मल्लिक यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, सराव आणि मेहनत यांचे मोलाचे योगदान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही मित नेमाडे आणि वृदांत पाटील उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.