विनयकुमार रामचंद्रराव देशमुख यांचे निधन संभाजीनगर येथे घेतला अखेरचा श्वास; देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर
विनयकुमार रामचंद्रराव देशमुख यांचे निधन
संभाजीनगर येथे घेतला अखेरचा श्वास; देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर
सावदा, जि. जळगाव | प्रतिनिधी- सावदा देशमुख वाडा येथील रहिवासी विनयकुमार रामचंद्रराव देशमुख हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर (वय ८२) यांचे गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती संभाजी नगर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिवारातील एक महत्त्वाचा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
विनयकुमार देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत