Contact Banner

स्व. हरिभाऊ जावळेंच्या जयंतीनिमित्त दुष्काळावर जाणीव-जागृतीसाठी कार्यकर्ता अभ्यास वर्ग फैजपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी आयोजन

 

sv-haribhau-javale-jayanti-drought-awareness-activist-study-class-faizpur-3-october

स्व. हरिभाऊ जावळेंच्या जयंतीनिमित्त दुष्काळावर जाणीव-जागृतीसाठी कार्यकर्ता अभ्यास वर्ग

फैजपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी आयोजन

लेवाजगत न्यूज फैजपूर : माजी खासदार तथा आमदार, कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता फैजपूर येथील शुभ दिव्य लॉन येथे कार्यकर्ता अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या निर्माण झालेली दुष्काळाची परिस्थिती, त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेली जाणीव-जागृती, तसेच जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाबाबत कार्यकर्त्यांमध्ये विचारमंथन व्हावे, या उद्देशाने या अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभ्यास वर्गात रवीजी भुसारी आणि राजू नन्नवरे मार्गदर्शन करणार आहेत. राजू नन्नवरे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे व्यवस्थापन परिषद सदस्य, विवेकानंद प्रतिष्ठान, जळगावचे अध्यक्ष तसेच पर्यावरण एवं निसर्ग संवर्धन इन्स्टिट्यूट, जळगावचे संचालक आहेत.

स्व. हरिभाऊ जावळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेत त्यांच्या जयंतीनिमित्त हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि दुष्काळाच्या परिस्थितीबाबत व्यापक जाणीव निर्माण करून भविष्यातील कार्याची दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.