Contact Banner

यावलमध्ये शिवसेना (उबाठा) नगरसेवकावर चाकूहल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

yawal-shiv-sena-corporator-sagar-chaudhary-knife-attack

यावलमध्ये शिवसेना (उबाठा) नगरसेवकावर चाकूहल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

डोक्यावर लाकडी फळीने मारहाण, पोटावर चाकूने वार; नगरसेवक सागर चौधरी गंभीर जखमी

यावल | प्रतिनिधी




यावल शहरात नगरसेवक तथा नगरपालिकेचे गटनेते सागर चौधरी यांच्यावर चौघांनी मिळून हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री सुमारे ११.१५ वाजता चावडी परिसरात घडली. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी यावल पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा उत्सवाच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर नगरसेवक सागर चौधरी हे बारी चौकाकडून चावडीमार्गे पायी घरी जात होते. यावेळी सागर कांबळे यांच्या घरासमोर विलास रमेश चौधरी याने दुचाकीवरून येत त्यांचा रस्ता अडवला आणि वाद घातला. त्यानंतर गोपाल नारायण चौधरी, अक्षय गोपाल चौधरी आणि दिनेश गोपाल चौधरी हेही घटनास्थळी आले. त्यांनी चौधरी यांना शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दिनेश चौधरी याने लाकडी फळीने सागर चौधरी यांच्या डाव्या कानावर व डोक्यावर मारहाण केली, तर अक्षय चौधरी याने धारदार चाकूने त्यांच्या पोटावर वार केल्याचे समजते. या हल्ल्यात सागर चौधरी गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर रस्त्याने जाणारे नरेंद्र माळी आणि राहुल चौधरी यांनी तत्परता दाखवत जखमी सागर चौधरी यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी यावल पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सुनील पाटील करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.