Contact Banner

भूकंपानंतर विहिरींचे पाणी आटल्याची अफवा खोटी; ‘लेवाजगत’च्या पडताळणीत सत्य समोर! सावदा-वाघोदा परिसरात सोशल मीडियावर अफवेची चर्चा; संबंधित व्यक्तीची अंदाजावर माहिती प्रसारित केल्याची कबुली, नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन

 

bhukampanantar-vihirinche-pani-atlyachi-afwa-khoti-lewajagat-fact-check

भूकंपानंतर विहिरींचे पाणी आटल्याची अफवा खोटी; ‘लेवाजगत’च्या पडताळणीत सत्य समोर!

सावदा-वाघोदा परिसरात सोशल मीडियावर अफवेची चर्चा; संबंधित व्यक्तीची अंदाजावर माहिती प्रसारित केल्याची कबुली, नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन

21-years-school-friends-reunion-umeswar-vidyalaya


सावदा, प्रतिनिधी : सावदा, वाघोदा आणि परिसरात आज सकाळी ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर परिसरातील काही विहिरी आणि बोअरवेलचे पाणी अचानक आटल्याची माहिती वेगाने व्हायरल झाली. मात्र, ‘लेवाजगत’ने या माहितीची पडताळणी केली असता, या दाव्याला कोणताही ठोस आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाघोदा येथील भारती बुवा मंदिराजवळील मस्कावत फाटा परिसरातील काही विहिरींचे पाणी भूकंपामुळे अचानक आटल्याचा संदेश सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या वृत्ताची सत्यता जाणून घेण्यासाठी ‘लेवाजगत’ने संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून चौकशी केली. यावेळी संबंधित व्यक्तीने ही माहिती प्रत्यक्ष पाहणी किंवा खात्रीशीर निरीक्षणाच्या आधारे नव्हे, तर केवळ अंदाजाच्या आधारे प्रसारित केल्याची कबुली दिली. त्यामुळे विहिरी व बोअरवेलचे पाणी भूकंपामुळे अचानक आटल्याचा दावा अप्रमाणित असल्याचे समोर आले आहे.

भूकंपासारख्या संवेदनशील घटनेनंतर अशा प्रकारच्या अफवा पसरल्यास नागरिकांमध्ये विनाकारण भीती आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आवश्यक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भर द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

अफवांपेक्षा सत्य महत्त्वाचे! भूकंपानंतर सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीची पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न ‘लेवाजगत’ने केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.