श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात ‘हिंद की चादर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात ‘हिंद की चादर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
भुसावळ : श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ येथे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मस्वातंत्र्याच्या संदेशाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने ‘हिंद की चादर’ हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात प्रभारी मुख्याध्यापक श्री. उमेश भास्कर खोडपे सर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी गुरु तेगबहादूरजी यांच्या जीवनकार्यावर, अद्वितीय त्यागावर, शौर्यावर तसेच धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानावर प्रकाश टाकला. सत्य, निर्भयता, धार्मिक सहिष्णुता, मानवता आणि बंधुभाव ही मूल्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावीत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल चौधरी मॅडम यांनी प्रभावीपणे केले. यावेळी विविध विद्यार्थ्यांनी गुरु तेगबहादूरजी यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून त्यांच्या महान त्यागाची, अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची, धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणाची तसेच समाजातील एकता आणि बंधुभावाच्या महत्त्वाची माहिती दिली.
कार्यक्रमाचा समारोप प्रतिभा आमोदेकर मॅडम यांनी केला. त्यांनी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून मिळालेली प्रेरणा आपल्या दैनंदिन आचरणात उतरवावी, असे आवाहन केले.
विद्यालयात आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता, देशभक्ती, संस्कार, मानवता आणि सामाजिक एकतेची भावना रुजविणारा ठरला. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत