Contact Banner

उमेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पुस्तकाबाहेरील जगाची सफर; शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न


umeshwar-madhyamik-vidyalaya-dasnूर-educational-tour-2026


उमेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पुस्तकाबाहेरील जगाची सफर; शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न


प्रतिनिधी : हेमंत चांदवे-


दसनूर, ता. रावेर : येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिनांक १६ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाली. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून विविध विषयांचे ज्ञान मिळविण्याची संधी उपलब्ध झाली.


या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी ओझर, लेण्याद्री, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर, आळंदी, देहू, लोणावळा येथील कार्ला लेणी, महड, पाली, खोपोली येथील इमॅजिका मनोरंजन उद्यान, नाशिक येथील पंचवटी परिसर व तारांगण, दिंडोरी तसेच वणी येथील सप्तशृंग गड अशा धार्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्या.


या भेटींमुळे विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, अध्यात्म आणि विज्ञान यांचे अनोखे विश्व जवळून अनुभवता आले. विविध ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य परिसर आणि वैज्ञानिक माहिती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी ज्ञानाची शिदोरी समृद्ध केली. सहलीत एकूण १०५ विद्यार्थिनी आणि ८० विद्यार्थी असे मिळून १८५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर सहलीचे आयोजन एसटी महामंडळाच्या बसद्वारे करण्यात आले होते.


पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्यास शिक्षण अधिक प्रभावी आणि आनंददायी होते, या शैक्षणिक दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेली ही सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच विविध विषयांचे ज्ञान मिळाल्याने त्यांच्या आनंदात भर पडली.


या शैक्षणिक सहलीच्या यशस्वी आयोजन व नियोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


लेवा जगत न्यूज | शिक्षण, संस्कार आणि ज्ञानविश्व


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.