Contact Banner

आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश; पीक विमा अर्जासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ तांत्रिक अडचणींमुळे विम्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अर्ज भरण्यास मिळाली अतिरिक्त संधी

 

mla-amol-jawale-follow-up-crop-insurance-deadline-extended-november-15-2026`


आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश; पीक विमा अर्जासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ


तांत्रिक अडचणींमुळे विम्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अर्ज भरण्यास मिळाली अतिरिक्त संधी


रावेर | प्रतिनिधी-


खरीप हंगाम २०२६ मधील पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. पीक विमा योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ वरून आता १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे रावेर-यावल तालुक्यासह राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) प्रणालीतील तांत्रिक अडचणी, गावांच्या नकाशांमधील त्रुटी, पीक पाहणीच्या नोंदी उपलब्ध नसणे तसेच सातबारा उताऱ्यावरील माहिती आणि ऑनलाइन प्रणालीतील तफावत यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचे अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत होता.


पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र शेतकरी अर्ज दाखल करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.


ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन आमदार अमोल जावळे यांनी २२ ऑक्टोबर रोजी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडे निवेदन सादर केले होते. त्यामध्ये पीक विमा योजनेची मुदत वाढविण्यासह डिजिटल पीक पाहणी प्रक्रियेलाही मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.


आमदार जावळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत पीक विमा अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज भरताना तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.


शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज भरावेत


पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपले अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.