Contact Banner

मंत्री संजय राठोड उद्यापासून दोन दिवसांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर; विविध विकासकामांची करणार पाहणी

 

मंत्री संजय राठोड उद्यापासून दोन दिवसांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर; विविध विकासकामांची करणार पाहणी

मंत्री संजय राठोड उद्यापासून दोन दिवसांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर; विविध विकासकामांची करणार पाहणी

जळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड हे रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ पासून दोन दिवसांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध विकासकामांची पाहणी करणार असून, प्रशासकीय बैठका आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.

प्राप्त दौरा कार्यक्रमानुसार, मंत्री संजय राठोड यांचे रविवारी सकाळी ६.३३ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ६.४५ वाजता शासकीय वाहनाने ते शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील.

सकाळी ९ वाजल्यापासून धरणगाव तालुक्यातील पथराड, शेरी, झुरखेडा, वाघळूद, कल्याणे आणि गणेशनगर या गावांमधील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध कामांची पाहणी त्यांच्या दौऱ्यात नियोजित आहे. त्यानंतर पारोळा तालुक्यातील मांठळे व टोळी येथील कामांचीही ते पाहणी करणार आहेत. या पाहणीदरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २.२५ वाजता मंत्री महोदयांचे शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन होणार असून, त्यानंतर विश्राम व राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. दुपारी ४ वाजता शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

यापूर्वी शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी मंत्री महोदयांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका, प्रशासकीय चर्चा आणि नियोजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यात भटके विमुक्त (DNT), बंजारा समाज तसेच बजरंग विरासत संघाच्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चेचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजना व कामांबाबत मृद व जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभागाशी संबंधित बैठकही नियोजित आहे.

मंत्री संजय राठोड यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाच्या कामांना गती मिळण्यास मदत होणार का, याकडे संबंधित गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.