Contact Banner

मंत्री छगन भुजबळ उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर; एरंडोल येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती

 

chhagan-bhujbal-jalgaon-district-visit-erandol-mahatma-phule-200th-jayanti-2026

मंत्री छगन भुजबळ उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर; एरंडोल येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती

जळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते एरंडोल येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (राजशिष्टाचार कक्ष) यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या दौरा कार्यक्रमानुसार, मंत्री भुजबळ यांचे सकाळी १० वाजता नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन होणार असून, तेथून विमानाने जळगावकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते मोटारीने एरंडोलकडे रवाना होतील.

दुपारी १२ वाजता एरंडोल येथील मराठी शाळा क्रमांक १, नगरपालिका जवळ, येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. यावेळी एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेडच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तसेच महात्मा ज्योतिराव फुले विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड, एरंडोल नामकरण कार्यक्रम होणार आहे.

दुपारी १ वाजता शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण करतील.

दुपारी ३ वाजता जळगाव विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना होणार असल्याचे दौरा कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.

मंत्री भुजबळ यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. दौऱ्यात Y+ दर्जाची सुरक्षा, एस्कॉर्ट तसेच वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था राहणार असल्याचे पत्रकात नमूद आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमांमुळे एरंडोलमधील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.