Contact Banner

भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सरदार पटेलांसारखे युगपुरुष नेतृत्व उदयास येते – डॉ. रवींद्र भोळे

 

sardar-patel-national-unity-day-hindu-ratna-award-pune

भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सरदार पटेलांसारखे युगपुरुष नेतृत्व उदयास येते – डॉ. रवींद्र भोळे

पुण्यात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘हिंदू रत्न पुरस्कार’ प्रदान

पुणे | प्रतिनिधी

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाच्या माध्यमातून राष्ट्राची समर्पित भावनेने सेवा केली. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील ५६५ हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून त्यांनी भारताच्या एकात्मतेचा भक्कम पाया घातला. हैदराबाद, जुनागढ यांसारख्या संस्थानांच्या विलीनीकरणासाठी त्यांनी प्रसंगी कठोर निर्णय घेतले. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतो, तेव्हा सरदार पटेलांसारखे युगपुरुष नेतृत्व उदयास येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी केले.

पद्मश्री डॉ. मणीभाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने पुणे येथे राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि ‘सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भोळे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त रवींद्र साठे होते. अध्यक्षीय भाषणात साठे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कणखर नेतृत्वाच्या जोरावर भारताला एकात्मतेच्या सूत्रात बांधले. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी योगदान द्यावे. अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यक्रमांमुळे राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होते. गेल्या तीन ते चार दशकांपासून डॉ. रवींद्र भोळे विविध क्षेत्रांत करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी व्यासपीठावर रमेश श्रीहरी तुरुंग, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, डॉ. पांडुरंग सराफ, रावसाहेब मोहनराव लवांडे, राजेश दातार, ममता यशवंत पाटील, डॉ. हरी निवृत्ती पाटील, डॉ. रघुनाथ महादू पाचपांडे, रामचंद्र ढाके, दैनिक संध्या यांच्या संपादिका ज्योती नाळे, प्रतीक राम गंगणे, स्मिता विनायक सहस्रबुद्धे, सुभाष कट्यारमल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. रत्नाकर रामचंद्र पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. रवींद्र भोळे लिखित ‘राष्ट्रनिर्माते कर्मयोगी, युगपुरुष सरदार पटेल’ या पुस्तकाच्या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. तसेच केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकर्त्यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कारार्थींमध्ये डॉ. पांडुरंग दगडू सराफ, ममता यशवंत पाटील, प्रतीक राम गंगणे, ज्योती नाळे, दीपक केशवराव दांदडे, विजयमाला महादेव पवार, डॉ. सुरेंद्र जगन्नाथ रौंदळे, रश्मी नरेंद्र जोशी, स्मिता विनायक सहस्रबुद्धे, प्रल्हाद गोपाळ खर्चे, वासुदेव रामभाऊ भंगाळे, दिगंबर पंढरीनाथ महाजन, डॉ. रघुनाथ महादू पाचपांडे, राजेश दातार, दिलीप गोविंदराव डहाके, संदीप भानुदास तापकीर, रामचंद्र पांडुरंग ढाके, प्रमोद नारायण सरोदे, आशा कैलास पाटील, ह.भ.प. दीपक महाराज पाटील, तुषार शरद चौधरी, डॉ. राहुल बाळकृष्ण भोसले, किरण लक्ष्मण तोडकर, अविनाश आनंदराव पवार, गजानन प्रल्हादराव ताठे, अजित सुरेश वाडगावकर, अमोल पंजाबराव वानखेडे, उज्ज्वला नवले, सोनाली शिंगारे, विठ्ठल नारायण शिंदे, शिवा राठोड, योगेश गोपाल भंडारे, रोहित आप्पा कंद, कीर्ती गजानन परास्कर, संजय रामनाथ टाकळकर, प्रकाश रावसाहेब लबडे, बाबासाहेब कृष्णा लबडे, रवींद्र उगलमुगले, विजय चंद्रकांत जगदने, ज्ञानेश्वर भानुदास भागवत, सुधीर डेंगळे, सूर्यभान अल्हाट, लालासाहेब सोपान जाधव, विवेक भागचंद शेलार, डॉ. ज्ञानेश्वर गणपत करपे, प्रा. सागर रोडे, ऋतुजा भोसले, स्वप्निल साठे, प्रतिभा अरविंद मांडे, निलेश खताड आणि संदीप रामदास नरसाळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

पुरस्कारार्थींना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंकुश दळवी, प्रफुल्ल झोपे आणि नॉर्मल नॉटन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. डी. साळवे सर यांनी केले, तर सुभाष कट्यारमल यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.