प्रा.आर.व्ही.पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव; मान्यवरांकडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
प्रा.आर.व्ही.पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव; मान्यवरांकडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक प्रा. आर. व्ही. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विभागाच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांना शाल व स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यात आला.
प्रा. आर. व्ही. पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात महाविद्यालयाच्या तसेच गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्ञानदानाप्रती असलेली निष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सहकाऱ्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, संचालक डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील तसेच संचालिका डॉ. अक्षदा पाटील यांनी प्रा. आर. व्ही. पाटील यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एच. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे, विभागातील प्राध्यापक डॉ. ईश्वर जाधव, डॉ. व्ही. डी. चौधरी, डॉ. देवेंद्र मराठे, प्रा. हेमराज धांडे तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी प्रा. पाटील यांच्या संस्थेप्रती असलेल्या योगदानाचे कौतुक केले. सेवानिवृत्ती हा केवळ नोकरीतील प्रवासाचा शेवट नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे सांगत त्यांना उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रा. आर. व्ही. पाटील यांनी आपल्या कार्यातून आणि अनुभवातून निर्माण केलेला आदर्श आगामी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत