सौ. निर्मला सरोदे यांचे निधन
सौ. निर्मला सरोदे यांचे निधन
लेवाजगत न्यूज मस्कावद : येथील श्री. आ. गं. हायस्कूल तसेच श्री. नामदेवराव गोमाजीराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अनेक वर्षे निष्ठेने सेवा बजावणारे सेवानिवृत्त पर्यवेक्षक सुधीर यशवंत सरोदे यांच्या पत्नी सौ. निर्मला सुधीर सरोदे (वय ६७, रा. मस्कावद) यांचे शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी पहाटे २.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाने सरोदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 3 वाजता मस्कावद येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत