Contact Banner

गोवर्धन पूजन व अन्नकूट महोत्सव सावदा स्वामीनारायण मंदिरात उत्साहात साजरा

 

savda-swaminarayan-temple-govardhan-puja-annakut-mahotsav-2026

गोवर्धन पूजन व अन्नकूट महोत्सव सावदा स्वामीनारायण मंदिरात  उत्साहात साजरा

सावदा : श्री वडतालधाम अंतर्गत येणाऱ्या सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात दीपावली पाडव्याच्या मंगल पर्वानिमित्त गोवर्धन पूजन व अन्नकूट महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

महोत्सवाची सुरुवात सकाळी गोवर्धन पूजनाने झाली. हे पूजन कलाशिक्षक नंदकुमार पाटील व पूनम पाटील यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. त्यानंतर हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांची आरती सद्गुरू शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी (अध्यक्ष, श्री स्वामीनारायण गुरुकुल, सावदा) यांच्या हस्ते करण्यात आली.

यानंतर आयोजित आशीर्वचन सभेत सद्गुरू शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी यांनी गोवर्धन पूजा व अन्नकूट महोत्सवाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशद केले. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा संदेश देत निसर्ग, गोमाता आणि सृष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण दिली. अन्नकूट महोत्सवातून भगवंताप्रती भक्तिभाव, समर्पण आणि अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते, असे त्यांनी सांगितले.

आशीर्वचन सभेनंतर भगवंताला विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण करून अन्नकूट आरती करण्यात आली. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी भक्तीप्रियदासजी, श्रीजीप्रियदासजी, भंडारी स्वामी माधवप्रियदासजी, मंदिराचे पुजारी सत्यप्रकाशदासजी यांच्यासह युवक मंडळ व युवक भक्तांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

सर्व संत, सेवेकरी व युवक मंडळाच्या सहकार्याने हा अन्नकूट महोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.