श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा येथे ९ नोव्हेंबर रोजी अन्नकूट उत्सवाचे आयोजन गोवर्धन पूजा, सत्संग सभा व अन्नकूट आरतीचे होणार आयोजन
श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा येथे ९ नोव्हेंबर रोजी अन्नकूट उत्सवाचे आयोजन
गोवर्धन पूजा, सत्संग सभा व अन्नकूट आरतीचे होणार आयोजन
लेवाजगत न्यूज सावदा : दीपावली पर्वानिमित्त श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा येथे सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य अन्नकूट उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत गोवर्धन पूजेने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत सत्संग सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता भगवान श्री स्वामिनारायण यांना विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण करून अन्नकूट आरती करण्यात येणार आहे.
या उत्सवासाठी विविध प्रकारचे पक्वान्न, मिठाई व खाद्यपदार्थांचा भव्य अन्नकूट सजविण्यात येणार आहे. धार्मिक वातावरणात भक्तिभावाने हा उत्सव साजरा करण्यात येणार असून भाविकांना दर्शन व आरतीचा लाभ घेता येणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन स.गु.को.शा. स्वयंपकाशदाजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तरी सावदा व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या अन्नकूट महोत्सवात सहभागी होऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थळ : श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत