टीसीएस इनक्विझिटिव्ह २०२६ : मुंबई फेरीत हिरानंदानी फाउंडेशन स्कूलचा डंका एआय आधारित रिअल टाइम विश्लेषणाचा स्पर्धेत प्रथमच समावेश; २८ शाळांमधील १२६ संघांचा सहभाग
टीसीएस इनक्विझिटिव्ह २०२६ : मुंबई फेरीत हिरानंदानी फाउंडेशन स्कूलचा डंका
एआय आधारित रिअल टाइम विश्लेषणाचा स्पर्धेत प्रथमच समावेश; २८ शाळांमधील १२६ संघांचा सहभाग
उरण | सुनील ठाकूर-
आधुनिक तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा संगम घडवणाऱ्या ‘टीसीएस इनक्विझिटिव्ह २०२६’ या आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या मुंबई विभागीय फेरीत ठाण्यातील हिरानंदानी फाउंडेशन स्कूलने विजेतेपद पटकावले. रोशन कन्ना आणि विवान कुंदेतकर या विजयी जोडीने राष्ट्रीय उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत मुंबई विभागातील २८ शाळांमधील १२६ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित रिअल टाइम विश्लेषणाचा करण्यात आलेला समावेश. प्रत्येक फेरीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण उपलब्ध करून देण्यात आले. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) यासह विविध ज्ञानशाखांवर आधारित प्रश्नांनी स्पर्धेत चांगलीच रंगत आणली.
यावेळी टीसीएस मुंबईचे सेंटर हेड मिलिंद कांबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दाखवलेले ज्ञान, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा आणि सांघिक कामगिरी कौतुकास्पद आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्यास आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
यंदा २८व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘टीसीएस इनक्विझिटिव्ह’ स्पर्धेच्या विभागीय फेऱ्या देशातील विविध शहरांमध्ये पार पडत आहेत. या फेऱ्यांमधील विजेते संघ राष्ट्रीय महाअंतिम फेरीत सहभागी होणार असून, ‘टीसीएस इनक्विझिटिव्ह नॅशनल चॅम्पियन्स २०२६’ हा मानाचा किताब पटकावण्यासाठी त्यांच्यात चुरस रंगणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत