अलर्ट!! भारतात होऊ शकतो एक प्रचंड सायबर हल्ला
कोविड -१९ फिशिंग मोहिमेच्या रूपात आज भारतात एक प्रचंड सायबर हल्ला होऊ शकतो
Phishing म्हणजे काय?
Fishing म्हणजे काय हे सर्व सामान्य लोकांना कदाचित माहीत असेल, ज्यात गडाला चारा लावून मासेमारी केली जाते, पण
Phishing या बद्दल तुम्हाला माहीत आहे काय?
फिशिंग अटॅक(Phishing Attack) हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे, ज्यात इंटरनेट वरील हॅकर्स त्यांच्या टार्गेट कडून वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात, जसे की क्रेडिट कार्ड तपशील, किंवा तुमच्या अकाऊंट चे पासवर्ड इत्यादी..
कसा होऊ शकतो Phishing Campain Attack?
कोविड -१९ संबंधित बहाण्याने वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी मोठ्या प्रमाणात फिशिंग हल्ल्या आज रविवार दिनांक 21 रोजी होऊ शकतो. सरकारने रविवारी लोकांना सावध राहण्यास सांगितले. Indian Computer Emergency Response Team (CERT-In) कडून यासंदर्भात सल्ला दिल्यानंतर हे निर्देश आले आहेत
फिशिंग हल्ल्याद्वारे सरकारी अनुदानीत कोविड१९ समर्थन उपक्रम च्या नावाखाली फेक ईमेल पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. असे ईमेल बनावट वेबसाइट्सकडे नेण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत जेथे व्हायरस युक्त फाइल्स डाउनलोड करण्यात किंवा वैयक्तिक माहिती प्रविष्ट करण्यास सांगितले जाते. टार्गेट कडून वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळवली जाऊ शकते" असे CERT-In कडून जाहीर करण्यात आले आहे.
सीईआरटी-इनने संभाव्य गळती टाळण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचे संवेदनशील दस्तऐवज संरक्षित करण्यास सांगितले आहे. तसेच लोकांना अँटी-व्हायरस साधने, फायरवॉल आणि फिल्टरिंग सेवा वापरण्याचे आवाहन केले आणि सीईआरटी-इनमध्ये कोणत्याही असामान्य क्रियेची किंवा हल्ल्याची नोंद करण्यास तत्काळ सांगितले आहे.
कोण आहे या हल्ल्या मागे?
सिंगापूरचे मुख्यालय असलेल्या सायबरसुरिटी वेंडर सायफर्माच्या मते, उत्तर कोरियाचा हॅकर गट (Lazarus Group) या मोहिमेवरुन आर्थिक फायदा मिळविण्याचा विचार करीत आहे, जेथे लक्ष्यित ईमेल प्राप्तकर्त्यांना फसव्या वेबसाइट्सना भेट देण्यास सांगितले जाईल आणि त्यांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा उघडकीस आणला जाईल, असे सिंगापूरचे मुख्यालय असलेल्या सायबरसुरिटी वेंडर सायफर्मा यांनी सांगितले.
Phishing Attack पासून कसे वाचावे?
१) फिशिंग हल्ल्यांपासून वाचायचं असेल तर आधी शहाणे व्हा..
ऑनलाईन ब्राउझिंग करताना आणि ईमेलचे परीक्षण करून फिशिंग हल्ल्यांचा बळी पडण्याची शक्यता आपण लक्षणीय कमी करू शकता.
अनोळखी व्यक्ती कडून आलेल्या इमेल मधिल लिंक्स उघडू नका, फाईल डाउनलोड करू नका किंवा अट्याचमेंट उघडू नका
ई-मेल मार्फत वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती (बँक डिटेल्स) मागितली जात असेल तर ती देऊ नका, कोणत्याच खऱ्या संस्था असली माहिती मागत नाही..
२) एखादी आलेला ई-मेल किव्वा टेक्स्ट मेसेज जर संशयास्पद वाटत असेल तर पुन्हा नीट वाचा, बऱ्याच वेळेस सायबर क्रिमिनल ई-मेल आणि मॅसेज बनवतांना चुकी करतात, जर तुम्हाला अशी चुक लक्षात आली तर सावध व्हा
3) बऱ्याच वेळेस सायबर क्रिमिनल फेक ई-मेल किंवा मेसेज मध्ये बनावट लिंक्स टाकतात ज्यावर क्लीक केल्यास ते युसर्स ला बनावटी वेबसाईट वर नेतात व तिथे वैयक्तिक माहिती भरण्यास सांगतात व मेसेज व्हाट्सएप ला फॉरवर्ड सुद्धा करायला सांगतात, असल्या मेसेज आणि ई-मेल पासून दूर राहावे व फॉरवर्ड करू नये
4) तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट, अमझोन अकाउंट, किंवा सोशिल आकाऊ चा पासवर्ड बदलण्यास सांगणारा मेसेज सुद्धा येऊ शकतो.. असे मेसेज ला बळी पडू नका,
पासवर्ड बदलायचाच झाल्यास अधिकृत वेबसाईट वर जाऊन बदलणेच योग्य..
सावध रहा सुरक्षित रहा
<div class='onesignal-customlink-container'></div>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत