Contact Banner

पोलीस प्रशिक्षण केंद्र पळवण्याचा घाट.जिल्ह्यात संताप

पोलीस प्रशिक्षण केंद्र पळवण्याचा घाट.जिल्ह्यात संताप
१९९९ मधे भूमिपुजन करतांना मान्यवर
सावदा प्रतिनिधी  
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आलेले तालुक्यातील हतनूर-वरणगाव येथील राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र हे अहमदनगर जिल्ह्यातील कुडसगाव येथे हलविण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील पुन्हा एक महत्वाचा प्रकल्प दुसरीकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बाबत वृत्त असे की . भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले होते,तथापि राज्य शासनाच्या गृह विभागाने आज जीआर काढून संबंधित केंद्र है अहमदनगर जिल्ह्यातील कुडसगांव येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक मंजूर प्रकल्प हे  एक तर रद्द करण्यात आलेत,तर काही दुसरीकडे हलविले जात आहेत.  माजी मंत्री एकनाथ खड़सेनी प्रयत्नपूर्वक जिल्ह्यात मंजूरी केलेले हे केंद्र देखील आता नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट  करण्यात येणार असल्याच स्पष्ट झाले आहे.तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधि करतात तरी काय असा प्रश्न सर्वत्र पड़ला आहे.
अशी संपली २५ वर्षे

पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी १९९५ मध्ये मान्यता मिळाली.
जमीन अधिग्रहणानंतर १९९९ मध्ये तत्कालीन गृहमंत्री स्व.
गोपीनाथ मुंडे, तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्याहस्ते भूमिपूजन झाले.

यानंतर मात्र ही प्रक्रिया दुर्लक्षित राहिली.२०१९ मध्ये भाजपा सरकारच्या काळात राज्य राखीव पोलिस बल केंद्राची स्थापना करण्यास व पदे भरण्यास मंजुरी मिळाली.तर आता २५  वर्षांनी निर्णय रद्द झाल्याने प्रक्रिया पुन्हा  थंडावली
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठा व पत वापरून प्रकल्प परत आणावा
 ✒जिल्ह्यासाठी नवीन प्रकल्प तर नाहीच पण जुने प्रकल्प हिरावून नेले जात आहेत.सरकारमध्ये असलेल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना माझे आवाहन आहे.त्यांनी सरकारमधील आपली प्रतिष्ठा व पत वापरून हा प्रकल्प पुन्हा परत आणावा.जिल्ह्यावर हा अन्याय आहे.यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करु.
{आ एकनाथ खडसे माजी मंत्री}
✒वरणगाव येथे राहिल प्रशिक्षण केंद्र, मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोललो आहे. वरणगाव येथे आधीचे पोलीस प्रशिक्षण केंद्र करून तेथे एस आर पी एफ चे प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले आहे वरणगावच्या केंद्र तेथेच कायम ठेवून अहमदनगर येथे दुसरे केंद्र द्यावे,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यातच राहील.
मा.गुलाबराव पाटील पालकमंत्री,जळगाव
✒विधानसभेत सरकारला जाब विचारणार, वा लवकर न्यायालयातही दाद मागणार  भाजपचे एक आमदार शरद पवारांच्या विरोधावत बोलले तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.आता तालुक्यातील प्रोजेक्ट राष्ट्रवादीचे आमदार पळवून नेत आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक भूमिका काय असेल?या प्रश्नी तर आम्ही विधानसभेत सरकारला जाब विचारू.मी स्वतंत्रपणे न्यायालयात दाद मागणार आहे.राज्य शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करतो.
{संजय सावकारे, आमदार, भुसावंळ}

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.