खेडी - भोकर पुलाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडून पाहणी
भूसंपादन न करता अलायमेंट करण्याचे सा.बां. विभागाला दिले निर्देश
*जळगाव दि. 6 : नाशिक येथील विभागीय बैठकीत मुख्यमंत्री मा. उद्धव साहेब ठाकरे यांनी खेडी - भोकर पुलाचे काम त्वरित हाती घेण्याबाबत संबंधित विभागाला निर्देशीत केले होते. त्या अनुषंगाणें पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांच्या सोबत खेडी- भोकर पुलाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलाचे काम लवकर सुरू करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचेही निर्देश दिले.*
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या पुलाचे बांधकाम करण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याची एक इंची शेतजमीन भुसंपादित न करता संरेखा (अलायमेंट ) निश्चित करण्या बाबत सा.बा. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना निर्देश दिले. सदर कामाला तात्काळ गती देऊन या पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या निधीपैकी जलसंपदा विभागाने त्यांचा निधीचा हिस्सा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्वरित वर्ग करण्यात यावा असेही सुचित केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 जुलें पर्यंत निविदा प्रसिध्द करण्याबाबत आदेशीत केले.
*...तर पंधराचे होतात सत्तर किलोमीटर !*
भोकर ते चोपडा हे अंतर फक्त 15 किलोमीटर आहे. मात्र, तात्पुरता पूल बंद झाल्यास हे अंतर 70 किलोमीटरचे होते. परिणामी वेळ व पैसा देखील खर्च होतो. शिवाय खेडी भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोरे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकऱ्यांना ये- जा करण्यासाठी या पुलाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांनी याठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अशी नागरिकांची मागणीची दखल घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्राधान्याने सदर काम हाती घेतले आहे.
या प्रसंगी चोपडाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सौ.लताताई सोनवणे , तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, गोपाल जिभाऊ पाटील, रामचंद्र बापू पाटील, जलसंपदा विभागाचे तांत्रीक सल्लागार व्ही.डी. पाटील सा. बां.विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, उपअभियंता श्रेणी 1 चे सुभाष राऊत ,शाखा अभियंता एस. बी.पाटील, अमित राजपूत ,बालाशेठ राठी, प्रमोद सोनवणे तसेच सा. बा. व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत