Header Ads

Header ADS

सावखेडा खुर्द येथे एक कोरोना बाधित आढळून आला...

सावखेडा खुर्द येथे एक कोरोना बाधित आढळून आला...
सावदा प्रतिनिधी सावखेडा ता रावेर आज दि ४ रोजी  आलेल्या कोरोना तपासणी अहवालात सावखेडा खुर्द 
 गावातील  एक  ५५ वर्षीय  रुग्ण  कोरोना बाधित आढळून आला आहे.बाधित रुग्णांला तीन दिवसांपूर्वी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते,
  सदरील ५५ वर्षीय रुग्ण  हे सावखेडा खुर्द येथील  रहिवासी  आहे. त्यांच्या पत्नीला व मुलाला कोरोटाइन करण्यात आले आहे. सदरील पॉझिटिव आलेला रुग्ण व त्याचा मुलगा केळी व्यवसायाची निगडित असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे तर याआधी सुद्धा चिनावल ला तीन रुग्ण आढळले आहेत, तर  कुभारखेडा येथे
एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला होता. तसेच कुंभार खेड्यात ही त्या बाधित रूग्णांच्या चार सदस्य यांना सावदा येथे कोरोनटाईन ठेवण्यात आले आहे, त्यांचा ही अहवाल एक दोन दिवसात येणार आहे , तर सावखेडा,कुंभार खेडा, चिनावल परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सावखेडा खुर्द येथील कोरोना बाधित रुग्णांच्या परिसरात सनी टायझरची फवारणी करण्यात आली.  हा एरिया कंटेनमेंट झोन व बफर झोन जाहीर करण्यात आला.बीडिओ सोनिया नाकाडे, शाखा अभियंता डी आर महाजन,तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील, तालुका सुपरवायझर रामभाऊ पाटील, डॉक्टर प्रीतेश पाटील, आरोग्य सेविका महेमुद तडवी, पल्लवी भारंबे, आरोग्यसेवक कैलास आदीवाले, वाहन चालक नितीन तायडे, ग्रामसेवक पी आर तायडे, सरपंच बेबाबाई बखाल, पोलीस पाटील बबीता तडवी, तलाठी अजय महाजन ,तलाठी उमेश बाभुलकर ,ग्रामसेवक एस टी पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदींनी परिसर सिल  व कंटेनमेंट झोन तयार करण्याकामी  सहकार्य केले.
 परिसर सील करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.