Contact Banner

विद्यापिठाच्या निकाल समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन कक्षाची मागणी

विद्यापिठाच्या निकाल समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन कक्षाची मागणी

जळगांव प्रतिनिधि :-
कबचौउमवि, जळगांव विद्यापीठाच्या एप्रिल/ मे 2019 परीक्षेच्या निकाल समस्येवर अभिविपतर्फे विद्यापीठ प्रशासनास निवेदन देण्यात येवून निकाल समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन कक्ष स्थापन करण्याची मागणी करण्यात आली .
कबचौउमवि ,जळगाव तर्फे एप्रिल-मे 2020 मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठ प्रशासन मूल्यमापन करून जाहीर करत आहे. या निकालात विद्यापीठ प्रशाळेतील संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत विषयांचे  अद्यावत गुण दिलेले नसले, परीक्षा अर्ज उशिरा भरलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण दिलेले नसणे अशा समस्या या निकालात होत्या. त्या लवकरात लवकर सोडून सदर विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात यावा अशी मागणी कबचौउमवि, जळगाव विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंगळ संचालय बी.पी. पाटील यांच्याकडे अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे व जळगाव महानगर मंत्री रितेश चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच येणाऱ्या काळात इतर शाखांचे व इतर वर्षांचे निकाल लागल्यावर विद्यार्थी समस्या वाढण्याची शक्यता आहे म्हणून निकाल समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठ मार्फत स्वातंत्र्य ऑनलाइन कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली . ज्या विद्यार्थ्यांना निकालात समस्या असेल त्यांनी अभाविप सोबत संपर्क करावा असे आवाहन अभिविपतर्फे करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.