मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींनमध्ये सरपंच म्हणुन युवकांना संधी द्यावी-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना ईमेलद्वारे विश्वजीत संजय पाटील यांची मागणी
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींनमध्ये सरपंच म्हणुन युवकांना संधी द्यावी-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना ईमेलद्वारे विश्वजीत संजय पाटील यांची मागणी
मुक्ताईनगर प्रतिनिधी:-शासनाने या पुढे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत प्रशासक नव्हे तर गावातील योग्य व्यक्ती सरपंच (प्रशासक) म्हणुन नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, तरी शासणाला एक युवक म्हणुन विनंती करतो कि देशाच भविष्य युवक असुन देशाच्या प्रगतीत युवकाचा मोठा हातभार आहे, युवकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असुन ग्रामिण भागातील सर्वसामान्य, होतकरु, शिक्षित युवकांना राजकारणात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन सरपंच (प्रशासक) म्हणुन नियुक्त करावे, अशी मागणी विश्वजीत संजय पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना इमेल द्वारे केली आहे.
ग्रामीण भागात अनेक युवक उच्च शिक्षित असुन त्यांचाकडे गावाच्या विकासाच्या संकल्पणा आहेत तरी शासनानाने मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीत(सरपंच)प्रशासक म्हणुन युवकांना संधी द्यावी अशी मागणी यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत