जिल्ह्यातिल शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरीया व इतर खते उपलब्ध करून द्यावी - रावेर युवासेनेची कृषिमंत्र्यांकड़े मागणी
जिल्ह्यातिल शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरीया व इतर खते उपलब्ध करून द्यावी - रावेर युवासेनेची कृषिमंत्र्यांकड़े मागणी
रावेर (प्रतिनिधी)जळगाव जिल्यातील शेतकरी प्रचंड अडचणींना सामोरे जात असताना , त्यांना देशावर आलेल्या या महाभयंकर कोरोना महामारीचा सामना करत असताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी अत्यल्प किमतीत विकली जात तर आहेच त्यांनी केळीला लावलेला खर्चही निघू शकत नाहीय
तसेच नवीन लागवड केलेल्या पिकांसाठी युरीया व इतर रासायनिक खते मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड निराशाजनक व तणावात आलेले आहेत ,
जळगाव जिल्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने कृषी मंत्री दादा भुसे याना एका निवेदनाद्वारे युवासेनेचे तालुका प्रमुख प्रवीण पंडित व सचिव जयेश पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी खताची उपलब्धता लवकरात लवकर व्हावी जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी राज्याला आपण या कोरोना महामारीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांचे पाठीशी सरकारने उभं राहावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत