Contact Banner

राज्यातील 102 रुग्णवाहिका 1800 चालकांचा आज पासून संप

राज्यातील 102 रुग्णवाहिका 1800 चालकांचा आज पासून संप 
तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 17 कंत्राटी चालकांचा आजपासून संप
नंदुरबार  प्रतिनिधी 
जिल्ह्यातील आरोग्य विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या 108  कंत्राटी रुग्णवाहिका चालक संघटनेच्यावतीने आजपासुन संप पुकारण्यात आला असून हा संप अखिल महाराष्ट्रातील कंत्राटी 108 रुग्णवाहिका चालकांचाअसुन राज्यातील 1800 कंत्राटी  रुग्णवाहिका चालक यांनी पुकारला असून आज दिनांक 3 जुलै 2020 पासून ते दि . 8 जुलै 2020 पर्यंत बंद करण्याबाबतचा निर्णय कंत्राटी चालक संघटनेने घेतला आहे यासंदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड याना निवेदन देण्यात आले आहे.
          निवेदनात म्हटले आहे की  यात कंत्राटी चालक संघटनेच्या प्रमुख मागण्या रुग्णवाहिका चालकांवर आरोग्य विभागाने व शासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे तरी अगदी अल्प मानधन घेऊन अहोरात्र कर्तव्य पार पाडून स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या आरोग्य विभागातील 102 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे मानधन वाढवून त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावे तसेच राज्यभरात रुग्णवाहिका सेवा अखंडपणे चालवित असलेल्या रुग्णवाहिका चालकांना कायम करण्यात यावे संपूर्ण जगात covid-19 या संसर्गजन्य विषाणूने ग्रासले असून भारतातही अतिशय संवेदनशील परिस्थिती असताना ज्याप्रमाणे डॉक्टर्स नर्स पोलीस आदी विभाग covid-19 या संसर्गजन्य विषाणूंशी लढत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 1800 कंत्राटी 102 रुग्णवाहिका चालक अल्प मानधनावर भोपाळ येथील अश्लोम मीडिया भोपाळ या प्रायव्हेट कंपनी मर्यादित च्या कंत्राटदाराच्या माध्यमातून जो शासनाकडून आमच्या नावावर  25 हजार रुपये प्रति महिना मंजूर असतानादेखील प्रत्यक्षात संबंधित कंत्राटदाराकडून फक्त 8000 हजार रुपये पगारावर या सर्व राज्यातील 1800 कंत्राटी 102 रुग्ण वाहिकाचालकांना भागवावे लागत आहे तर उर्वरित पैशांवर नेमकं कोण डल्ला मारतो?असा प्रश्न या सर्व कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना पडला आहे ज्याप्रमाणे आरोग्य विभागाने रुग्णवाहिका चालक पदाची भरती करण्याचे त्याग केले आहे तसेच रुग्णवाहिका आरोग्य विभागाची नस असुन तिच्या चालकांना राज्य शासनाच्या अस्थापणावर आजपर्यंतची सेवा अनुभव कौशल्य शिक्षणाच्या आधारावरून सर्व 1800 रुग्णवाहिका चालकांना वीणा अटी व शर्ती शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे आगामी व होणाऱ्या आरोग्य विभागाच्या पदभरती मध्ये ज्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स क्लर्क क्ष-किरण टेक्निशियन शिपाई इत्यादींना विशेष महत्त्व देऊन त्या पदाची भरती करण्याचे शासनाने निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 1800 रुग्णवाहिका कंत्राटी चालकांना देखील तुच्च व कमी दर्जाचे समजुन भरती रद्द करण्याचा शासनाचा व आरोग्य विभागाचा न्याय विसंगत व तर्कविसंगत अन्यायकारक भूमिका शासनाने घेतली असून ती मागे घेण्यात यावी व राज्यातील सर्व 1800 रुग्णवाहिका कंत्राटी चालकांवर महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग अत्याचार करीत आहे त्यासाठी राज्यातील संपूर्ण 102 रुग्णवाहिका चालक यांनी आजपासून संप पुकारला आहे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना देण्यात आलेल्या निवेदनावर कंत्राटी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश पवार उपाध्यक्ष लोटन बावा सचिव शाबाज शेख यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.