Header Ads

Header ADS

अपघातात एक ठार, चुंचाळे फाट्यावर दुचाकी आणि मिनीट्रक यांची झाली धडक

 

            अपघातात एक ठार

चुंचाळे फाट्यावर दुचाकी आणि मिनीट्रक यांची झाली धडक

यावल दि-३१ - रोजी  बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर  सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू ट्रक यांच्या जोरदार धडक झाल्याने अपघात झालेला असून या अपघातात मुकेश लोटन सोनार, वय ५५ वर्ष, मेहरूण  जळगाव हा जागीच ठार झालेला आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की, साकळी या गावातील मालवाहू ४०७ मिनीट्रक क्रमांक MH- १९ ४१०० हा जळगाव येथे माल आणण्यास जात असताना चुंचाळे फाट्याजवळ ट्रक व दुचाकीमध्ये जोरदार धडक झाल्याची माहिती नागरिकांकडून मिळालेली आहे. या अपघातात मुकेश लोटन सोनार, वय ५५ वर्ष मेहरूण जळगाव हे जागीच ठार झालेले असून रुपेश सोनार, वय ३५ हे गंभीर जखमी झालेले आहे. दोघेही मेहरूण जळगाव येथील रहिवासी आहेत. वरील दोघे जण दुचाकी क्रमांक MH-१९ CQ २९८९ ने जळगावहून यावलकडे येत होते.

 अपघातातील जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.या घटनेत ४०७ मिनीट्रक चालक सलिम अब्दुल शेख रा .साकळी ता.यावल याचे विरोधात यावल पोलिसात गुरन-१४७भां.द.वी. कलम ३०४, ३३७, २७९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास पो.हे.काॕ. संजय देवरे हे करीत आहे.

   दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील वळणावर कृजर गाडीचा अपघात झालेला होता. यामध्ये सहा जण जखमी झाले होते. तर गाडीचे खूप मोठे नुकसान झाले होते. सदरील रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.