महाराष्ट्राचे प्रथम निवडणूक आयुक्त डी एन चौधरी यांचे निधन
महाराष्ट्राचे प्रथम निवडणूक आयुक्त डी एन चौधरी यांचे निधन
मुंबई प्रतिनिधी दि ३१- महाराष्ट्राचे प्रथम निवडणूक आयुक्त डी एन चौधरी यांचे काल रात्री मुंबई येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले ते ९० वर्षांचे होते.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग २६ एप्रिल १९९४ ला स्थापन करण्यात आला होता.त्यावेळी प्रथम निवडणूक आयुक्त म्हणून कै देवराम नामदेव चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. चौधरी हे मूळ राहणार भालोद तालुका यावल जि जळगाव येथील रहिवासी होते. व सनदी सेवेतील वरिष्ठ आणि जाणकार अधिकारी होते.१९९९ पर्यंत कै चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त पद सांभाळले होते.
चौधरी यांच्या कार्यकाळात विविध अधिनियम,नियम,आदेश व सूचना पारित करण्यात आल्या ज्यामुळे निवडणुका घेण्याची पद्ध्ती व त्यास कायदेशीर आधार प्राप्त झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत