Header Ads

Header ADS

हेमंत जनार्दन नेहेते यांची भाजपा कामगारआघाडी शहर अध्यक्षपदी निवड

  

हेमंत जनार्दन नेहेते यांची भाजपा कामगारआघाडी शहर अध्यक्षपदी निवड


वार्ताहर दि . 24 : - हेमंत जनार्दन नेहेते यांची भाजपा कामगारआघाडी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे स्वागत शहरातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी , नगरसेवक , युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले असुन हेमंत जनार्दन नेहेते हे 16 वर्षापासून कामगार श्रेत्रात कार्यरत असुन ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये सक्रीय आहे . एक युवा चेहरा म्हणुन त्यांनी कामगार क्षेत्राशी निगडीत कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते तत्पर आहेत . तसेच सामाजिक क्षेत्रात अनेक दिवसापासुन कार्यरत असुन अनेक समाजोपयोगी कार्य त्यांनी केले असुन स्वत : महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत असोसिएट कामगार असुन त्यांना कामगार क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांची जाण असल्याने कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली असुन त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे . आमदार सीमाताई हिरे व शहर अध्यक्ष गिरीष पालवे यांनी त्यांची निवड केली असुन आमदार सीमाताई हिरे तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक , पदाधिकारी यांनी हेमंत नेहते यांचे अभिनंदन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.