Header Ads

Header ADS

मुक्ताईनगर येथील आदीशक्ती श्री संत मुक्ताईच्या मंदिरात भाजपाच्या पदाधिकारी यांनी चंपला घालुन केलेल्या आंदोलनाचा जामनेर तालुका युवासेना व शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध

 

मुक्ताईनगर येथील आदीशक्ती श्री संत मुक्ताईच्या मंदिरात भाजपाच्या पदाधिकारी यांनी चंपला घालुन केलेल्या आंदोलनाचा जामनेर तालुका युवासेना व शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध

      जामनेर प्रतिनिधि(चंद्रकांत पाटील):- कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे .नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाचा कारभार मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी योग्य प्रकारे प्रशासन हाताळले व अजूनही हाताळत आहे .त्यामुळे  जनमाणसात सरकारचे कौतुक होत आहे .अशा परिस्थितीत भाजप ला कोरोना संकट काळापेक्षा सत्ता गेल्याची जास्तच सल आहे . याचमुळे कोरोना काळात जनहिताचे कार्य विरोधी भाजप पक्षाकडून अपेक्षित असतांना त्यांच्याकडून घाणेरडे राजकारण सुरूच आहे. अशातुनच काल राज्यभरात मंदिरे सुरू करण्यासाठी घंटानाद आंदोलन करून केविलवाणे राजकारण करण्याचा प्रयत्न केला.  यातच मुक्ताईनगर येथील श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या पावन तिर्थस्थळी मंदिराच्या गाभाऱ्यात चक्क चपला घालून घंटानाद भाजप पदाधिकाऱ्यांनी केला .भरीसभर हिंदू धर्मात भगवंताच्या आवाहनास जे शुचिर्भूत होऊन शंखनाद केला जातो , तो शंखनाद देखील या बहाद्दूरांनी चपला घालूनच केला. यामुळे तमाम वारकरी व हिंदू धर्मियांच्या भावना दुखविल्या गेल्या भाजपा पदाधिकारी यांनी केलेल्या या कृत्याच्या जामनेर तालुका शिवसेना व युवासेनेने निषेध करुन मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले.
          यावेळी युवासेनेचे तालुका प्रमुख विशाल लामखेडे, अतुलभाऊ सोनवणे,भुषणभाऊ ललवाणी,निळकंठ पाटील, महेंद्र भाऊ बिराडे,चंद्रकांत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.