Header Ads

Header ADS

सावद्यात चार ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र

 


सावद्यात चार ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र 

सावदा प्रतिनिधी:-  शहरात सार्वजनिक गणेश मंडळांची साध्या पद्धतीने जल्लोष न करता शासकीय नियमांचे  पालन करीत सार्वजनिक तसेच घरा घरात खाजगी गणपती ची  स्थापना करण्यात आली आहे.

 शहरात ३० सार्वजनिक मंडळांनी चार फुटाच्या आत  मूर्तीची स्थापना केली आहे. यावर्षी कोरोना विषाणूच्या  संसर्गामुळे विसर्जन  मिरवणूक ढोल तासे, बँड, ब्यांजो चा जल्लोष न करता  निघणारे हे पाहिलेच वर्ष असेल असे वयोवृद्ध  जाणकार म्हणतात विसर्जन मिरवणूक न काढता स्थापना केलेल्या स्थानाहून थेट संकलन केंद्र स्थळी श्री ची मूर्ती  मंडळांनी बिना वाद्य गर्दी ना करता आणायची आहे नदीपात्रात गर्दी होऊ नये याकरिता सावदा शहरात चार ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे नगरपालिकेमार्फत  उघडण्यात आली आहे. यात खाजगी घरगुती मूर्ती व सार्वजनिक मूर्ती यांचे संकलन करून त्यांना नगरपालिकेचे मार्फत विसर्जन स्थळी नेण्यात येणार आहे .तरी सर्व खाजगी मूर्ती ची  स्थापना केलेल्या व सार्वजनिक मंडळांना  प्रशासनाचे आवाहन करण्यात येते की मोठा मारुती गांधी चौक, मोठा आड  चौक ,सोमवार गिरी मढी चौक ,लहान मारुती  इंदिरा गांधी चौक  याठिकाणी नगरपालिके मार्फत श्रींची मूर्ती संकलित केली जाणार आहे तरी त्या परिसरातील नागरिकांनी मूर्ती  आरती करून संकलन केंद्र ठिकाणी आणावे ,विसर्जन स्थळी येताना गर्दी करू नये असे मुख्याधिकारी सौरभ जोशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आहे. मुख्यधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी महेश चौधरी, सतीश पाटील व इतर कर्मचारी या मूर्ती खाजगी भाड्याने केलेल्या नगरपालिका मार्फत वाहनाने विसर्जनस्थळी पोहचवतील नागरिकांनी सूचनांचे पालन करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.