सावदावासीयांना दिलासा-कोविड -१९ अँटीजन टेस्ट च्या ८० तपासणीत सर्व निगेटिव्ह
सावदावासीयांना दिलासा-कोविड -१९ अँटीजन टेस्ट च्या ८० तपासणीत सर्व निगेटिव्ह
सावदा प्रतिनिधी:- शहरात नगरपालिके मार्फत घेण्यात येत असलेल्या कोविड -१९ अँटीजन टेस्ट तपासणी शिबिरात दि. १५ रोजी च्या अहवालात ८० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्या तपासणीत सर्व ८० नागरिक निगेटिव्ह आल्याने सावदा शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठ दिवसापासून झालेल्या कोरोना तपासणीत एकही रुग्ण बाधित आढळुन न आल्याने प्रशासनाचे प्रयत्न तर नागरिकांचे सहकार्य मुळे रुग्ण संख्या कमी करण्यात यश येत आहे.
तरी नागरिकांनी फिजिकल डिस्टनसिंग, चेहऱ्यावर मास्क,सतत दिवसातून ४ वेळेस हाथ स्वछ धुवावे ,विनाकारण विनाकाम घराबाहेर निघू नये वेळोवेळी मिळणाऱ्या शासकीय सूचनांचे पालन करावे व शहर कोरोना मुक्त करावे असे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.
सावदा शहरात आजच्या दिवस पर्यंत कोरोना बाधित रुग्ण संख्या २१५ झाली असुन त्यात ११ मयत झाले तर ० रुग्ण उपचार घेत आहेत व बाकी २०४ बाधित रुग्ण कोरोनाला हरवून घरी सुखरूप परतले आहे.गेल्या सात दिवसात शहरात एकही रुग्ण बाधित आढळला नाही.शहराची वाढचाल कोरोना मुक्ती कडे सुरू आहे.
आज पर्यंत शिबिरात २०४० नागरिकांची तपासणी करण्यात आली. ही नागरिकांची तपासणी नगरपालिका प्रशासनामार्फत मोफत करण्यात आली.शिबिरात नागरिकांनी तपासणी करिता यावे असे आवाहन मुख्यधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयीन कर्मचारी सहकार्य करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत