तापी नदी पात्रात निमगावच्या महिलेची आत्महत्या
तापी नदी पात्रात निमगावच्या महिलेची आत्महत्या
तापी पुलावर पंधरा दिवसात तिसरी घटना
भुसावळ प्रतिनिधी- येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेत निमगाव तालुका यावल येथील महिलेने बुधवारी सकाळी ११ वाजता आत्महत्या केली. गेल्या पंधरा दिवसांतील पुलावरून नदीपात्रात आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे.निमगाव येथील विजया कावळकर वय ३५ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांनी रहदारी सुरू असतांना समोर पुलावरून उडी घेतल्याने खळबळ उडाली. त्यामुळे घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पूल व परिसरात गर्दी झाली होती. शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी ,हवालदार संजय पाटील, भुषण चौधरी ,जाकीर शेख यांनी घटनास्थळ गाठून गर्दी पांगवली घटनास्थळ फैजपूर पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्यांना माहिती कळविण्यात आली. फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे हवलदार किरण चाटे घटनास्थळावर आल्यानंतर मृतदेह नदीपात्रातून वर काढण्यात आला. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत