Header Ads

Header ADS

माजी मंत्री खडसे सह रोहिणी खडसे चा प्रवेश ? राष्ट्रवादी का शिवसेना सस्पेन्स कायम

 


माजी मंत्री खडसे सह रोहिणी खडसे चा प्रवेश ?

राष्ट्रवादी का शिवसेना सस्पेन्स कायम

 सावदा प्रतिनिधी -भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला  तर त्यांच्या सोबत कोणकोण पक्षांतर करतील असा प्रश्न भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये चर्चिला जात  आहे. मात्र खडसे यांचे समर्थक सध्या सत्तेच्या पदावर आहेत त्यांना पदाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पक्षांतर न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे वृत्त आहे.

      जिल्हा परिषद, पंचायत समित्या ,महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ खडसे यांचे समर्थक जिल्ह्याभरात आहेत नाथा भाऊंनी पक्षांतर केले तर आपल्यालाही करावे लागेल आणि अशावेळी सत्तेचे पद सोडावे लागेल का अशा विवंचनेत काही पदाधिकारी होते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था होती त्यांना दिलासा देणारा संदेश नुकताच पाठवण्यात आला आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे सत्तेचे पद नाही असे नाथाभाऊ समर्थक त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील सत्तेच्या त्या पदाची मुदत संपल्यानंतर संबंधित पदाधिकारी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील  असे ठरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

     सध्या एकनाथ खडसे कोणत्याही पदावर नाही यांच्या कन्या  रोहिणी खडसे या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असून त्यांची पाच वर्षांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे त्या देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातील असे संकेत आहे मुक्ताईनगर, सावदा  नगरपालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक एकाच वेळी पक्षांतर करतील आणि त्यामुळे त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही असे सांगण्यात येत आहे अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी तूर्त राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत खासदार रक्षा खडसे ,खडसे समर्थक आमदार जिल्हा परिषद पदाधिकारी, नगरसेवक ,पंचायत समिती सदस्य, सहकारी संस्थांमधील पदाधिकारी आपल्या आपल्या पदावर कायम राहणार असून ते संबंधित संस्थेचे पुढील निवडणूक येईपर्यंत भाजपमध्येच असतील त्यांच्या संभाव्य विषयावरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना हा निरोप देण्यात आला आहे राष्ट्रवादीत जाण्याच्या अटी-शर्ती बाबतीत अजूनही निकटवर्तीयांना देखील कोणतेही बाबी सांगितल्या नाहीत केवळ प्रवेश झाल्यास कोण येऊ शकेल पण पुढच्या टप्प्यात पक्षात येईल कोणाला कोठे संधी शक्य आहे याबाबतचे मंथन खडसे यांच्या निवासस्थानी सुरू आहे असे सांगण्यात येत आहे.

आगे कुछ तो होने वाला है खडसेंचे सूचक वक्तव्य

सस्पेन्स  ठेवला कायम माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. काल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आगे कुछ तो होने वाला आहे असे सूचक वक्तव्य केले येथील निवासस्थानी बोलताना खडसे यांनी पक्षांतराचा सस्पेन्स कायम ठेवला मंगळवारी भाजपने धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मागणीबाबत आंदोलन केले या आंदोलनाला खडसे अनुपस्थित होते. तसेच जामनेर येथे झालेल्या जी एम हॉस्पिटलचे उद्घाटना कडेही त्यांनी  पाठ फिरवली होती त्यामुळे बुधवारी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यावर आगे कुछ तो होणे वाला हे असे खडसे म्हणाले. मी कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप नक्की नाही असेही त्यांनी स्पष्ट केले त्यांच्या या वक्तव्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

नाथाभाऊ शिवसेनेत यावे यासाठी काही  शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले होते तसेच काही महिन्यापूर्वी नाथाभाऊ समर्थक  कार्यकर्त्यांचीही  म्हणणे असे होते की नाथा भाऊंनी शिवसेनेत प्रवेश करावा आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की नाथाभाऊ च्या  हातावर घड्याळ का  हातात शिवधनुष्य असेल ? नाथाभाऊनीही त्याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. बघूया आठ दहा  दिवसात काय  होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.