वाजोळ्यात ६ वर्षीय बालीकेवर नराधमाने केला अत्याचार
वाजोळ्यात ६ वर्षीय बालीकेवर नराधमाने केला अत्याचार
भुसावळ प्रतिनिधी- भुसावळ तालुक्यातील वांजोळा या छोट्याशा गावात एका सहा वर्षीय मूकबधीर बालिकेवर गावातीलच एका नराधमाने बुधवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाशवी अत्याचार केल्याने तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
सविस्तर घटनाही की बालिका घरी एकटी असताना नराधमाने तिला सायकलवर बसवत स्वतःच्या घरी आणून अत्याचार केला .याच वेळी पीडित बालिकेचे वडील कामावरून घरी आले. त्यांना घरात मुलगी न दिसल्याने त्यांनी शोधाशोध केली संशयितांच्या घराजवळ त्यांना बालिकेचा रडण्याचा आवाज आला त्यांनी घराचे दार उघडल्यावर नराधमाचे वृत्त समोर आले. मुलीची आई शेतातून आल्यावर मुलीच्या वडिलांनी त्यांना घडलेली घटना सांगितली .त्यामुळे तिच्या आईवडिलांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना माहिती दिली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ बालिकेस डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
या घटनास्थळी भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केलेली असून एका संशयित नराधमास ताब्यात घेतलेले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.
नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा द्या - जि.प.सदस्या सौ.पल्लवीताई सावकारे
या पिडीत मुलीच्या कुटुंबियांची जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवीताई सावकारे यांनी भेट घेऊन त्या कुटुंबियांना धीर दिला. तसेच आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्या नराधमास तात्काळ भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी तरच या घटनांना आळा बसेल अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्या सौ.पल्लवीताई सावकारे यांनी दिलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत