थर्टीफर्स्टला डीजे वाजवण्यावर बंदी
थर्टीफर्स्टला डीजे वाजवण्यावर बंदी
प्रतिनिधी :-भुसावळ
31 डिसेंबरला ठिकठिकाणी विविध कार्यक्रम, पार्ट्यांचे आयोजन केले जाते. डीजे वाजवला जातो. मात्र, गर्दीम झाल्यास कोरोनाचे सावट पाहता यंदा डीजे वाजवण्यावर बंदी आहे. शहरात कुठेही डीजे लावण्यास डिजे चालकावर गुन्हा दाखल होईल. एवढेच नव्हे तर डीजे जप्त करण्यात येईल. या नियमाचे पालन होते किंवा नाही, यांच्या पाहण्यासाठी पोलिसांचे पथक दुचाकीवर गस्त घालणार आहे.
31 डिसेंबरला असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन व्हावे, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यासाठी शहर, बाजारपेठ,तालुका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी बैठक घेतली. यात यंदा 31 डिसेंबरच्या काळात जमावबंदीचे आदेश आहेत. कोरोनाचा धोका पाहता यंदा सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत घरात थांबुनच करावे. कुठेही रात्रभर हॉटेल, बार,परमिट रूम,बिअर शॉपी ठरवलेल्या वेळीनंतर सुरू राहणार नाही, याची दक्षता घ्यावी असे सूचना केली.
ढाबे, परमिट रूमवरही लक्ष
यंदाच्या थर्टीफस्टवर कोरोनाचे सावट असल्याने बाहेरील हॉटेल,ढाबे, परमिट रूम हे ठरवून दिलेल्या वेळेच्या आत बंद होतील. त्यामुळे थर्टीफस्टचा आनंद घेण्यासाठी यंदा हौसींना घरातच अथवा मित्रांकडे पार्टी करावी लागेल. बाहेर पार्टी केल्यास पोलिसांच्या रडारवर राहणार आहे.
दुसऱ्याला त्रास देऊन स्वागत नको
● सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्यामुळे इतरांना त्रास नको, याचे भान राहिले पाहिजे. आपल्या परिवारासोबत घरातच नवीन वर्षाचे स्वागत करा. रात्री 11 वाजे नंतर फिरणाऱ्यांची चौकशी व प्रसंगी कारवाई होईल.
-सोमनाथ वाघचौरे,
डीवायएसपी,भुसावळ
यांच्यावर होणार कारवाई
थर्टीफस्टला सायंकाळपासून पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुरू होणार आहे. यात अल्पवयीन मुले गाडी चालवताना सापडल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होतील. वेगात गाडी चालवणाऱ्याची वाहने जप्त करून कारवाईला तोंड द्यावे लागेल. यात कोणाचीही हयगय होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत