माजलगाव शहरात तरुणावर तलवारीने हल्ला
माजलगाव शहरात तरुणावर तलवारीने हल्ला
प्रतिनिधी :-माजलगाव
एका युवकाने दुसऱ्या युवकाला शिवीगाळ करत त्याच्यावर तलवारीने हल्ला करून जखमी केले. ही घटना माजलगाव शहरातील बाय पास रोडवरील हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि. 25) रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. आकाश शिवाजी पवार (27 रा. चिंचगव्हाण) असे जखमी युवकाचे नाव आहे.
शहरातील अशोक नगरातील विकास दिलीप शरणांगत याने अशोक पवारला फोन करून तू कुठे आहेस असे विचारणा केली. तेव्हा आकाशने बायपास रोडवरील तात्याच्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा घेत असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात त्या ठिकाणी आलेल्या विकासाचे आकाशला शिवीगाळ व हल्ला केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत