ब्रिटनहुन अकोल्यात आलेले दोघे बाधित त्यांचा वैद्यकीय अहवाल पाठवला पुण्याला
ब्रिटनहुन होऊन अकोल्यात आलेले दोघे बाधित त्यांचा वैद्यकीय अहवाल पाठवला पुण्याला
अकोला प्रतिनिधि:- इंग्लंड येथून प्रवास करून अकोल्यात आलेले दोन जणांचा वैद्यकीय अहवाल नागपूर मध्ये कोरोना पॉझिटिव आला. त्यामुळे आता त्यांच्यावर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती शनिवारी डिसेंबरला नागपूरच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र जनुकीय रचनेत बदल झालेल्या नव्या विषाणूची संबंधितांना लागण झाली.अथवा नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यांचे अहवाल एनआयव्ही पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दरम्यान नागपूर महापालिकेचे उपायुक्त जलज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड प्रवास करून दोन नागरिक 13 डिसेंबर ला अकोल्यात पोहोचले होते. त्यानंतर 21 डिसेंबरला ते नागपुरात आले,तेथे तपासणी त्यांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांच्या नागपुरात उपचार सुरू आहेत. पुणे प्रयोगशाळेतून संबंधितांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर नवीन कोरोना विषाणूची लागण झाली किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत