भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा कोरोना पॉझिटिव्ह
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा कोरोना पॉझिटिव्ह.bjp che rastriy adhyaksh j p nadda corona positive
सावदा प्रतिनिधी-भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोना संसर्ग झाला असल्याचे त्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. माझं हे आवाहन आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी. असं आवाहन जे. पी. नड्डा यांनी केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत