भोई कुटुंबावर काळाचा घाला.अपघातात तीन ठार ,चार जखमी परिसरात शोककळा bhoi kutumbavar kalacha ghala. apghatat
भोई कुटुंबावर काळाचा घाला.अपघातात तीन ठार ,चार जखमी परिसरात शोककळा
bhoi kutumbavar kalacha ghala. apghatat 3thar 4 jakhami parisrat shokakala
तांदलवाडी प्रतिनिधी-येथून जवळच असलेल्या रायपूर तालुका रावेर येथील भोई परिवारातील सदस्य कामानिमित्त नाशिक येथे गेले होते. नाशिक येथून घरी परतीच्या मार्गावर रायपुर येताना मुंबई-आग्रा महामार्गावर उमरणे गावाजवळ मंगळवारी दिनांक २२ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास ट्रक व तवेरा चा भीषण अपघात झाला त्यात तवेरा मधील दोन जण जागीच ठार तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर चार जण जखमी आहेत तवेरा ने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला त्यात तवेरा ची पुढील बाजू चक्काचूर होत त्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये रायपूर येथील भागवत सिताराम भोई वय पंचेचाळीस, आरती भागवत भोई वय ३९, सुभाष सिताराम भोई वय ३५ यांचा समावेश आहे .तर कैलास सिताराम भोई वय ४२, वंदना कैलास भोई ३८ हे गंभीर जखमी झाले.
याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला दरम्यान रायपूर येथील कुटुंबावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली , गावात एकही चूल पेटली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत