Contact Banner

दानवेंनी बळीराजाची माफी मागावी युवासेनेची मागणी


 दानवेंनी बळीराजाची माफी मागावी युवासेनेची मागणी

_शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरणारी आवलाद कोणाची-विश्वजितराजे_


आज दि.१२-१२-२०२० (शनिवार)

                 देशात शेतकरी अंदोलन तापत असतांना सर्वत्र त्याचे पडसात उमटतांना दिसत आहे. ठिकठिकाणाहून शेतकरी समर्थनार्थ प्रतिक्रीया उमटत असतांना.देशाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका सभेत शेतकरी अंदोलन चीन व पाकिस्तानचे षडयंत्र असल्याची बेताल वक्तव्य केले.

                        केंद्रीय मंत्र्याकडुन आलेल्या ह्या वक्तव्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका युवासेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आणि दानवेंनी शेतकरी राजाची जाहीर माफी मागावी असे निवेदन जामनेर पोलिस स्टेशन ला देण्यात आले.

                      शेतकऱ्यांवर नेहमी अपशब्द वापरणारी अवलाद कोणाची अशी जहरी टिका युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांनी केली.

                       प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीतराजे पाटील,तालुका प्रमुख विशाल लामखेडे,माजी. उपजिल्हाप्रमुख ॲड.भरत पवार,तालुका प्रसिद्धी प्रमुख मुकेश जाधव,ज्ञानेश्वर जंजाळ,कैलास माळी,हर्षल चौधरी,अरुण सावकारे,रोहन राठोड,विकास अहिरे,कृष्णा देवरे,गणेश शिंदे आणि युवासैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.