Contact Banner

डेंग्यूचा उद्रेक पुन्हा वाढला ; २० रुग्णांवर उपचार

 


डेंग्यूचा उद्रेक पुन्हा वाढला ; २० रुग्णांवर उपचार 

प्रतिनिधी भुसावळ:- गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिपरिप पाऊस यामुळे दमट वातावरणाची निर्मिती झाली आहे. यामुळे डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या एडीस इजिप्ती डासांचा उपद्रव रखडला आहे. यामुळे आता दीड महिन्यांच्या कालखंडानंतर पून्हा डेंग्यूचा उद्रेक वाढला आहे. आठवडाभरात डेंग्यूचे रुग्णवाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले होते. त्यावेळी शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे ७० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु होते. आता या आठवड्यात पून्हा ढगाळ वातावरण झाल्याने पुन्हा डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे . सध्या फैलाव सुरुच आहे. अॅक्टिव्ह रुग्ण कमी होत नाहीत तोच आता डेंग्यूचे भीती वाढली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.